Wednesday, 15 July 2020

मो अक्षरापासून सुरू होणारे शब्द


🔶 *उत्तराच्या शब्दाची सुरूवात (मो) या अक्षराने व्हावी.*

🔶 थुईथुई नाचणारा पक्षी - *मोर*
🔶 सुंदर आकर्षक - *मोहक*
🔶 छोटे या शब्दाला विरुद्ध अर्थांचा शब्द  -  *मोठे*
🔶 लुब्ध होणे -  *मोहित* 
🔶 बंधनमुक्त -   *मोकळा , मोकाट*
🔶 लाकडांची बांधतात -  *मोळी*
🔶 आकर्षित करण्याची कला -  *मोहिनी*
🔶 श्रीकृष्णाचे एक नाव - *मोहन*
🔶 एक सुगंधी फूल -  *मोगरा*
🔶 तुटलेले -  *मोडके*
🔶 हा समुद्रातील शिंपल्यात तयार होतो  -  *मोती* 
🔶 गणपतीचा आवडता पदार्थं -  *मोदक* 
🔶 किंमत  -  *मोल*
🔶 पायात घालतात -   *मोजे*
🔶 एक रसदार फळ -  *मोसंबी* 
🔶 कामाबद्दल दिली जाणारी रक्कम -  *मोबदला* 
🔶 एका रंगाचे नाव -  *मोरपंखी* 
🔶 लाडूंचा एक प्रसिद्ध प्रकार -  *मोतीचूर*
🔶 नाकात घालण्याचा एक दागिना - *मोरणी* 

🔶 *संकल्पना व निर्मिती - नंदा परदेशी धुळे*

No comments:

Post a Comment