परिसरातील व्यवसाय व कारागीरांची माहिती घेऊया
(१) शेतकरी -
--- शेतकरी अनेक प्रकारची धान्ये पिकवतो.
भात, कापूस व ताग यांची लागवड करतो.
(२) कुंभार -
--- कुंभार मातीची मडकी, कुंड्या व पणत्यातयार करतो.
(३) सुतार --
--- सुतार दरवाजे, खिडक्या, कपाटे, खुर्च्या
वगैरे लाकडाच्या वस्तू तयार करतो.
(४) गवंडी --
--- गवंडी घरासाठी विटांच्या भिंती रचतो.
(५) शिंपी --
--- शिंपी निरनिराळ्या तऱ्हेचे कपडे शिवतो.
(६) शिक्षक --
--- शिक्षक मुलांना शिकवून त्यांना ज्ञान देतात.
(७) डाॅक्टर --
--- डाॅक्टर आजारी लोकांना औषध देऊन बरे करतात.
(८) चांभार --
--- चांभार चामड्याच्या चपला, बूट व बॅगाबनवतो.
(९) सोनार --
--- सोनार सोन्या - चांदीचे निरनिराळे दागिनेबनवतो.
(१०) बुरूड --
--- बुरूड बांबू , गवत यांच्या चट्या, टोपल्याव तट्टे तयार करतो.
(११) विणकर (कोष्टी ) --
--- विणकर (कोष्टी ) हातमाग व यंत्रमाग यांवर कापड विणतो.
(१२) लोहार --
--- लोहार कडी -कोयंडे, कोयते इत्यादीलोखंडाच्या वस्तू तयार करतो.
No comments:
Post a Comment